आजची गरज- व्यावसायिक शिक्षण
करिअरची दिशा निश्चित झाल्यानंतर ज्या विश्वासाने आणि अपेक्षेने विद्यार्थी एखाद्या
संस्थेमध्ये संबधित कोर्ससाठी प्रवेश घेतो. तो विश्वास ख्रर्या अर्थाने सार्थ होतो
की नाही किंवा ती अपेक्षा पुर्ण होते की नाही हे तो कोर्स पूर्ण केल्यानंतर समजते.
कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थाला निवडलेल्या करिअर संबंधी आणि स्वत: विषयी पुर्णपणे
आत्मविश्वास निर्माण होण्याची गरज आहे. असे झाले तरच तो स्वत:चे करिअर आणि पर्यायाने
भविष्य घडवू शकतो. हा दृष्टिकोन ठेऊनच जाहिरात, फोटोग्राफि, ग्राफिक्स/ अनिमेशन आणि
प्रिन्टिंग क्षेत्राशी संबंधित ’क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट’ हा अद्यावत कोर्स आम्ही डिझाईन
केला. आणि अल्पावधीतच या कोर्सला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.”एक
वर्षात कमवायला शिका’ हे आमचे ब्रीद वाक्य आम्ही सिध्द केले आहे. पुर्णपणे व्यावसाय़भिमुख
असलेला हा कोर्स पुर्ण केल्यावर विद्यार्थी ’क्रिएटिव्ह डिजिटल आर्टिस्ट’या अर्थात
ग्राफिक डिझाईनर म्हणून स्वतंपणे स्वत:चा व्यवसाय सुरु करतो किंवा त्याला नोकरी करण्याची
इच्छा असल्यास जाहिरात एजन्सी, अनिमेशन स्टुडिओ, वेब डेव्हलपर्स, डिजिटल फोटो ल्याब,
डिजिटल प्रिंटिंग युनिटस, इमेज प्रोसेसिंग युनिटस, प्रिंटिंग प्रेस, न्युज पेपर्स,
पब्लीकेशन्स आदी ठिकाणी नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.
आजच्या स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी पुस्तकी द्यानापेक्षा जास्त गरज आहे. हे लक्षात
घेऊनच जाहिरात/ ग्राफिक्स/ अनिमेशन क्षेत्रात अगदी हमखास यशस्वी होण्यासाठी आवश्यक
तोच क्रमवार अभ्यासक्रम आम्ही तयार केला आहे, या क्षेत्रात व्याप्ती समजावून सांगण्याचा
प्रयत्न या माहितीपुस्तकेतून केला आहे. जेणेकरुण या कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वीच कोर्सनंतर
च्या करिअरची कल्पना य़ावी
( टीप :- क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट’, डिजिटल आर्टिस्ट , कमर्शिअल आर्टिस्ट, कमर्शिअल डिजिटल आर्टिस्ट, ग्राफिक डिझाईन, ग्राफिक डिझाईनर, ग्राफिक आर्टिस्ट, या एकाच अर्थाच्या विविध संद्या आहेत. हा आर्टिस्टच पुढे अनिमेशन शिकून अनिमेटर आणि वेब डिझाईन शिकून वेब डिझाईनर होतो, थोडक्यात आधी आर्टिस्ट, त्यानंतर ग्राफिक डिझाईनर आणि शेवटी अनिमेटर हा क्रम असतो, डायरेक्ट अनिमेटर शिकून कोणी एकदम अनिमेटर होऊ शकत नाही, तो फक्त कॉम्प्युटर ऑपरेटर होतो.)