आजची गरज- व्यावसायिक शिक्षण
करिअरची दिशा निश्चित झाल्यानंतर ज्या विश्वासाने आणि अपेक्षेने विद्यार्थी एखाद्या संस्थेमध्ये संबधित कोर्ससाठी प्रवेश घेतो. तो विश्वास ख्रर्या अर्थाने सार्थ होतो की नाही किंवा ती अपेक्षा पुर्ण होते की नाही हे तो कोर्स पूर्ण केल्यानंतर समजते. कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थाला निवडलेल्या करिअर संबंधी आणि स्वत: विषयी पुर्णपणे आत्मविश्वास निर्माण होण्याची गरज आहे. असे झाले तरच तो स्वत:चे करिअर आणि पर्यायाने भविष्य घडवू शकतो. हा दृष्टिकोन ठेऊनच जाहिरात, फोटोग्राफि, ग्राफिक्स/ अनिमेशन आणि प्रिन्टिंग क्षेत्राशी संबंधित ’क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट’ हा अद्यावत कोर्स आम्ही डिझाईन केला. आणि अल्पावधीतच या कोर्सला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.”एक वर्षात कमवायला शिका’ हे आमचे ब्रीद वाक्य आम्ही सिध्द केले आहे. पुर्णपणे व्यावसाय़भिमुख असलेला हा कोर्स पुर्ण केल्यावर विद्यार्थी ’क्रिएटिव्ह डिजिटल आर्टिस्ट’या अर्थात ग्राफिक डिझाईनर म्हणून स्वतंपणे स्वत:चा व्यवसाय सुरु करतो किंवा त्याला नोकरी करण्याची इच्छा असल्यास जाहिरात एजन्सी, अनिमेशन स्टुडिओ, वेब डेव्हलपर्स, डिजिटल फोटो लॅब, डिजिटल प्रिंटिंग युनिटस, इमेज प्रोसेसिंग युनिटस, प्रिंटिंग प्रेस, न्युज पेपर्स, पब्लीकेशन्स आदी ठिकाणी नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.
आजच्या स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी पुस्तकी द्यानापेक्षा जास्त गरज आहे. हे लक्षात घेऊनच जाहिरात/ ग्राफिक्स/ अनिमेशन क्षेत्रात अगदी हमखास यशस्वी होण्यासाठी आवश्यक तोच क्रमवार अभ्यासक्रम आम्ही तयार केला आहे, या क्षेत्रात व्याप्ती समजावून सांगण्याचा प्रयत्न या माहितीपुस्तकेतून केला आहे. जेणेकरुण या कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वीच कोर्सनंतर च्या करिअरची कल्पना य़ावी
( टीप :- क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट’, डिजिटल आर्टिस्ट , कमर्शिअल आर्टिस्ट, कमर्शिअल डिजिटल आर्टिस्ट, ग्राफिक डिझाईन, ग्राफिक डिझाईनर, ग्राफिक आर्टिस्ट, या एकाच अर्थाच्या विविध संद्या आहेत. हा आर्टिस्टच पुढे अनिमेशन शिकून अनिमेटर आणि वेब डिझाईन शिकून वेब डिझाईनर होतो, थोडक्यात आधी आर्टिस्ट, त्यानंतर ग्राफिक डिझाईनर आणि शेवटी अनिमेटर हा क्रम असतो, डायरेक्ट अनिमेटर शिकून कोणी एकदम अनिमेटर होऊ शकत नाही, तो फक्त कॉम्प्युटर ऑपरेटर होतो.)
आजची गरज- व्यावसायिक शिक्षण
शिक्षणाचा पहिला उद्देश द्यान संपादन करणे. द्यान संपादन केल्यानंतर त्या द्यानाचा उपयोग चरितार्थासाठी करणे. म्हणजे त्या द्यानाच्या आधारावर नोकरी किंवा व्यवसाय करणे. कोणतीही जोखीम न पत्कारता काहीजण नोकरी पसंत करतात किंवा भरमसाठ पैसे मोजून सरकारी नोकरी मिळ्वण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. विनासायास जीवन जगण्याचा तो राज्यमार्ग आहे असे ते समजतात. सगळी सुखे मिळवून जीवन आरामात जगावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण सुखाच्या कल्पना आणि जीवनाचं तत्वद्यान प्रत्येकांच वेगळं असतं, म्हणूनच कोणी नोकरी करतो. कोणी जोखीम पत्करुन एखादा व्यवसाय करतो. पण शिकताना ज्या विषयाचे द्यान संपादन करायचे असते ते अगदी परिपूर्ण असंल पाहिजे. अभ्यास हि एक न संपणारी अखंड साधना आहे, अभ्यास परिक्षेसाठी नसतो, जर जीवनाच्या सत्वपरिक्षेसाठी असते. हे विद्यार्थीदशेत लक्षात येत नाही. आजच्या स्पर्धात्मक युगात जीवन जगणे म्हणजे एक सत्वपरिक्षाच आहे. त्यामध्ये पास होण्यासाठी काटेकोर आणि कठोर अभ्यास करणे गरजेचे आहे. हेतूशुन्य अर्धवट द्यान असल्यास कामाचे नसते. विषय छोटा असला तरी अभ्यास मोठा करण्याची आज गरज आहे, सध्याची शिक्षण पध्दती बदलून व्यवसायाभिमुख शिक्षण पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं. जाहीरात, फोटोग्राफी, ग्राफिक्स, अनिमेशन, आणि प्रिन्टिंग क्षेत्रातील एक व्यावसायिक या नात्याने आम्हालाही तसंच वाटलं आणि म्हणूनच या क्षेत्रात ज्याची अत्यंत गरज आहे असा क्रिएटिव्ह आर्टिस्ट, ग्राफिक डिझाईनर, अनिमेटर तयार होण्यासाठी विद्यार्थ्याला बदलत्या काळानुसार बदललेलं अद्यावत शिक्षण द्यायला हवं याची जाणीव झाली. या जाणीवेतूनच "क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट " हा पूर्णपणे व्यावसायिक अभ्यासक्रम असलेला कोर्स आम्ही सुरु केला.
सी.डी आर्ट कोर्सनंतर जाहिरात, फोटोग्राफी, अनिमेशन आणि प्रिंटीग क्षेत्रात ग्राफिक डिझाईनर/ एनिमेटर म्हणून तो करिअला सुरुवात करु शकतो. ग्राफिक डिझाईनिंगचे कोणतेही काम तो आत्मविश्वासाने अगदी अचूकपणे पूर्ण करेल हा आमचा दावा आहे. सर्वांगिण बाजूने विचार करण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होऊन कला आणि त्याची उपयोगिता यावर तो जाणीवपूर्वक चिंतन करु शकेल. कोणत्याही विषयाकडे गांभीर्याने पाहणारा, जीवनाबद्द्ल विशाल द्दष्टिकोन ठेऊन स्पर्धात्मक जगात टिकणारा ग्राफिक डिझाईनर तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
ग्राफिक/ एनिमेशनसाठी असणारी केवळ सॉफ्टवेअर्स शिकवून हे शक्य नाही. त्यासाठी आवश्यक असणार्या इतर अत्यंत महत्वाच्या विषयांचा अभ्याक्रम या कोर्समध्ये आहे. ज्याचा उपयोग नोकरी/ व्यवसाय करत असतात महत्वाच्या गोष्टीचे निर्णय घेण्यासाठी होतो.
एनिमेशन एनिमेशन म्हणजे नेमके काय?
अस्तित्वात असलेल्या किंवा नसलेल्या निर्जिव वस्तुला सजीव करुन तीला हलते बोलते करणे म्हणजे अनिमेशन... काल्पनिक द्ष्ट्याचे चित्रिकरण म्हणजे एनिमेशन... मन आणि कल्पनांचा खेळ वास्तवार उतरवणे म्हण्जे एनिमेशन.... थोडक्यात अशक्य ते शक्य करते ते अनिमेशन असेच म्हणावे लागते.... गुढ गंभीर, अनाकलनीय, विचित्र, विक्षिप्त तरीही सत्य भासते आणि मनोरंजक असते ते एनिमेशन.....
एनिमेशनबद्द्ल असं बरंच काही सांगता येईल. एनिमेशन हे एक मनोरंजक करिअर आहे. सर्वच क्षेत्रात याची गरज आहे. म्हणून हे सर्वव्यापी करिअरचे क्षेत्र आहे. आणि याची व्याप्ति मोठी असल्याने या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत. हे क्षेत्र पूर्णत: कलेशी संबंधित असल्याने ज्याना कलेची आणि नाविन्याची आवड आहे त्यांनी या क्षेत्रात आल्यास एक उत्तम क्रिएटिव्ह करिअर घडते
’क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट’ (C.D.Art) म्हणजे काय? आणि या कोर्सचा कालावधी किती?
जाहीरात, फोटोग्राफी, एनिमेशन, प्रिन्टिंग आणि इंटरनेट क्षेत्रात कराव्या लागणार्या परिणामकारक कॉम्प्युराईज्ड डिझाईनला क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट’ असे म्हणतात. या सर्वच क्षेत्रात अत्यंत आवश्यक आणि प्रचंड मागणी असलेला क्रिएटिव्ह ग्राफिक डिझाईनर आणि नंतर अनिमेटर तयार करणे हा य़ा कोर्सचा उद्देश आहे. सवार्थाने एक परिपूर्ण ग्राफिक डिझाइनर आणि नंतर अनिमेटर बनवण्यासाठी तंत्रशुध्द स्टेप बाय स्टेप अभ्यासाची गरज असते. म्हणुन सी.डी आर्ट कोर्सचा कालावधीही टप्याट्प्प्याने वाढवला आहे. प्रथम वर्ष हे अत्यंत महत्त्वाचे असून त्यामध्ये
ऑडव्हर्टायझिंग, प्रिटिंगसह, ग्राफिक डिझाईनचा अभ्यास आहे ज्याचा उपयोग दुसर्या आणि तिसर्या वर्षी अनुक्रमे थ्रीडी आणि टूडी एनिमेशनकिंवा वेब डिझाईनिंगसाठी होतो. प्रथम वर्षानंतरच त्याला नोकरी हवी असल्यास तीही मिळ्ते. कारण एनिमेशनसाठी आवश्यक असलेल्या ग्राफिक डिझाईनचा परिपूर्ण अभ्यास हा पहिल्या वर्षीच झालेला असतो.
क्रिएटिव्ह आर्ट- काल आणि आज
ऑड्व्हर्टायझिंग आणि प्रिटींगसाठी ग्राफिक डिझाईनिंग शिकण्यास पूर्वी चार पाच वर्षे लागायची. या चार पाच वर्षामध्ये ड्राईंग आणि पेन्टिंगपासून सुरुवात होऊन ग्राफिक डिझाईनिंग म्हणजे काय? आणि प्रिन्ट मिडियासाठी विविध प्रकारच्या जाहिराती कशा तयार होतात याचा अभ्यास असायचा, यामध्ये स्केचिंग पासून फायनल आर्टवर्कपर्यंत सर्व प्रोसेस मॅन्युअल होत्या. तेव्हा जाहिरातींमध्ये फोटोग्राफिंचा वापर एका ठराविक मर्यादेपर्यंत सिमीत होता. पाच वर्षाच्या अभ्यासानंतर मॅन्युअल डिझाईनिंग, आर्टवर्क, आणि कटिंग पेस्टिंगच्या कौशल्यावर कमर्शिअल आर्टिस्ट म्हणून जॉब मिळायचा. मॅन्युअल फोटोफिनिशिंगसाठी एअर ब्रश वापरण्याचे कौशल्य असणार्या एअर ब्रश आर्टिस्ट महत्व तेंव्हा वेगळंच होतं. पण आज अशा प्रकारचे मॅन्युअल डिझाईनिंग, आर्टवर्क, कटिंग पेस्टिंगचे काम अन फोटोफिनिशिंगसाठी एअरब्रशचा वापर पूर्णत: कालबाह्य ठरला आहे. चार पाच वर्षे अभ्यास करुन ऑड्व्हर्टायझिंग आणि प्रिंटिंग मिडियासाठी ग्राफिक डिझाईनिंगची कामे करणार्या कमर्शिअल आर्टिस्टची जागा आता क्रिएटिव्ह डिजिटल आर्टिस्ट/ ग्राफिक डिझाईनरने घेतली आहे. कॅम्प्युटरच्या सहाय्याने फोटोमिक्सिंगसह क्रिएटिव्ह, आकर्षक अन प्रभावी डिझाईन्स बनवणे हे आजच्या जाहिरात क्षेत्राचं डिजिट्ल गुपित हॊऊन बसले आहे. आर्टिस्ट तोच आहे. जाहिरातीचा उद्देश तोच आहे. थोड्याफार फरकाने जाहिरातीच्या कल्पनाही त्याच आहेत. फ्क्त त्या जाहिरातींची डिझाईन्स करण्याचं तंत्र बदललं, साधंण बदलली, पेन्सिल, रंग, ब्रश, कागद जाऊन त्या ठिकानी कॉम्प्युटर आला. डिझाईनींग किंवा जाहिरातीची कल्पना दॄश्य स्वरूपात येण्यासाठी लागणारा वेळ वाचला. कामामध्ये अचुकता आली. सुलभता आली. त्यामुळे ग्राफिक डिझाईनिंग, प्रिंटींग आणि मल्टिमिडियातील कल्पक जाहिरातीसाठी कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य़ बनला आणि म्हणूनच चार पाच अभ्यास करुन सुध्दा विद्यर्थी प्रत्यक्ष काम करतात डिजिटल अटनामुळे गोंधळून जातो. सद्यस्थितीचा हा सारासार विचार करुनच चित्रकला, फोटोग्राफी आणि जाहिरातीची आवड असणार्या विद्यार्थ्यासाठी क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट आम्ही सुरु केला.
आर्ट, डिजिटल आर्ट आणि आर्टिस्ट म्हणजे नेमके काय?
आणि त्याचा जाहिरात क्षेत्रात संबंध कसा येतो?
काम कोणतेही असू दे. तिथे कलेची आवकश्यता असते. परंतू काम करणारा प्रत्येकजण कलाकार असतोच असे नाही. उत्त्म कलेशिवाय चांगले काम होऊ शकत नाही. आणि सतत काम करित राहिल्याशिवाय चंगले काम होऊ शकत नाहि. आणि सतत काम करित राहिल्याशिवाय कला आत्मसात होत नाही. हे साध सोपं समीकरण आहे. स्वत: च्या कामातील चुका शोधत शोधत कलेचा शोध लागतो आणि कलाकार बनतो. कला जन्मजात किंवा उपजत असते असे म्हणतात पण कला स्वत:च्या कामातील चुका शोधण्याच्या व्रुतितून जन्माला येते आणि चुकांचे प्रमाण कमी होत जाईल तशी ती पूर्णत्वाकडे जाते असेही म्हणता येईल. चित्रकलेचि, संगीतचि, साहीत्याची किंवा खेळाची आवड असणे, बारीक सारीक गोष्टी चिकित्सक नजरेने पाहणे आणि त्यातून नाविण्याचा शोध घेणे व स्वत: काहीतरी नवीन निर्माण करणे म्हणजे कला. एखादी गोष्ट प्रामाणिक पणे मन लावून करणे आणि स्वत:चे इतरांपेक्षा वेगळे असे अस्तित्व सिध्द करणे हे कलेशिवाय शक्य नाही, विषय कोणताही असो, कला सर्वव्यापी आहे. कोणताही खेळ, कोणताही शास्त्र, कोणताही विषय कलेशिवाय पूर्ण होत नाही. कला म्हणजे कौशल्य कोणतेहि काम असू दे, तिथे कौशल्य लागतेच. अर्थातच, कोठेही जा, काहीहि करा तिथे कला आणि कौशल्य असलेच पाहीजे. कला आणि कौशल्याशिवाय कोणतेही काम अर्थहिन असते. बोलण्याची कला लिहिण्याची कला, चित्रकला, संगीतकला साहित्यकला. कला म्हणजे सौंदर्य. कला म्हणजे निटनेटकेपणा, कला म्हणजे द्यान, कला म्हणजे विद्यान, कला म्हणजे तडजोड नव्हे, कला म्हणजे पैसा नव्हे, कला म्हणजे कोणाची मक्तेदारी नव्हे, कला म्हणजे आनंद, कला म्हणजे समाधान, कला म्हणजे फक्त डिग्री नव्हे किंवा कला म्हणजे एखादे सॉफ्टवेअर्स नव्हे, कला म्हणजे परिपक्वता, कला म्हणजे विषयाला समजून घेण्याची वृत्ती, कला सर्वंकश असते, चित्रकला असू दे, संगीतकला दे किंवा साहित्यकला असू दे, कोणीही एक कला इतर कलांपासून विभक्त नसते, तिचे स्वरुप वेगळे असले तरी इतर कलांशी ती संबंधित असते, संगीतातील ताल, चित्रातील सौंदर्य, साहित्यातील बोध, खेळातील कौशल्य, बोलण्यातील भावार्थ, द्यानतील परिपक्वता, आणि विद्यानातील अचूकता म्हणजेच कला. कलेतील या विविधतेतील सारांश शोधुन प्रामाणिकपणे एखाद्या गोष्टीचे समर्थन करण्यची कला म्हणजे "जाहिरात कला" या मध्ये कला म्हणजे चित्रकला हवी, सौंदर्य द्रुष्टि हवी, या ठिकाणी कला म्हणजे कल्पना हवी, त्या कल्पनेची जोड कुठेतरी सत्याशी असावयास हवी सत्य ही कलेतील फार मोठी ताकद असते. अतिशयोक्ति हा कलेतील पोरकटपणा आहे. अशी ही सर्वगुणव्यापी जाहिरात कला आजच्या स्पर्धात्मक युगात अत्यंत मोलाची आणि अत्यावश्यक बनली आहे.
सर्वगुणव्यापी मी एवढ्यासाठी म्हणतो की, या कलेमध्ये सर्व विषयांचा समावेश असतो. नुसती चित्रे काढता येतात म्हणून कॊणी उत्त्म जाहिरात बनवू शकत नाही, नुसती कल्पना लढवून उत्तम जाहिरात बनू शकत नाही, किंवा उत्तम मांडणी आणि आकर्षक रंगरंगोटी करुन चांगली जाहिरात बनु शकत नाही चांगली जाहिरात आणि सुंदर जाहिरात यामध्ये फरक आहे, जाहिराती मध्ये परिणाम महत्वाचा असतो. जाहिरात निव्वळ डोळ्याला चांगली वाटून उपयोग नाही. तर तिचा परिणाम मनावर व्हावा लागतो. तरच ती जाहिरात पाहणार्याचे मत परिवर्तन करते. म्हणून जाहिरात कले मध्ये मनाचा अभ्यासही तितकाच महत्वाचा ठरतो. अशा या सर्वसमावेशक जाहिरात क्षेत्रात डिजीटल ग्राफिक्स/ एनिमेशन
प्रवेशाने जाहिरातींचा चेहरामोहरा बदलून गेला आहे.
"क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट" (C.D.ART) हा कोर्स झाल्यानंतर काय़?
आजचं युग जाहिरातीचं, नव्हे डिजिटल जाहिरातीचं युग आहे. डिजिटल प्रिटींग पॅकेजिंगचं युग आहे, डिजिटल मल्टिमिडिया प्रेझेंटेशनचं युग आहे.
टूडी, थ्रीडी एनिमेटेड चित्रपटाचे युग आहे. विश्वास बसणार नाही अशा चित्रपटातील स्पेशल इफेक्टसचं युग आहे. जाहिरात पाहिली नाही किंवा ऎकली नाही असा एक ही दिवस जात नाही. घरी वर्तमानपत्र, साप्ताहीक, मासिक वाचा तेथे जाहिरात, फिरायला किंवा कामासाठी बाहेर जा, समोर मोठ्मोठ्या जाहिराती (होर्डिंग्ज). सिनेमाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला जा, तिथे जाहिराती. दुकानात खरेदीला जा तिथेही चिटकवलेल्या अन लटकविलेल्या जाहिराती आपण पाहतोच. त्यामध्ये बॅक्स पॅकेजिंग अन पौच पॅकेजिंगचा समावेश आहे. जीवनावश्यक बहुतांश गोष्टी या पॅकेजिंगमधुनच मिळतात, मीठ, मसाले, दूध, तेल, सौदर्य प्रसाधने, बेकरी प्रोडक्टस, ऑफिस स्टेशनरी, अगरबत्ती, अत्तरे, शॅम्पू, टिव्ही, फॅन, रेडिमेड कपडे, ड्रेस मटेरिअल, गिफ्ट आर्टिकल्स. इ. इ. इ अनेक गोष्टि पॅकिंगमध्येच उपलब्ध असतात. आकर्षक रंगसंगती, रचना आणि लक्षवेधक फोटोमिक्सिंग इफेक्ट वापरुन त्या जाहिराती आणि पॅकिंग मटेरियल अधिकाधिक आकर्षक आणि परिणामकारक करण्याचा प्रयन्त केलेला असतो. जाहिराती आणि पॅकेजिंग मटेरियल याचबरोबर कंपनी लोगो आणि सिम्बॉल डिझाईन, स्टेशनरी प्रिंटिंग मध्ये व्ही. कार्ड, लेटरहेड, बिलबुक, रिसीट बुक, इ. साठी डिझाईन्स, कंपनी कॅटलॉग फोल्डर. लिफलेट डिझाईन, परफेक्ट फोटो स्कॅनिंग, कलर सेरेशन, स्टिकर्स, पोस्टर्स, डॅंग्लर डिझाईन्स, लग्न पत्रिका, निमंत्रण पत्रिका, हॉटेल मेनू कार्ड, लॅमिनेशन/ डिस्प्ले बोर्डसाठी डिझाईन, फोटो फिनिशिंग, लहान फोटोवरुन मोठा फोटो करणे, ब्लॅक-व्हाईट फोटोवरुन कलर फोटो करणे, अल्बमसाठी फोटो मिक्सिंग/ स्पेशल इफेक्टस, व्रुत्तपत्र, साप्ताहीक, मासिकांसाठी जाहिरातींची डिझाईन्स, पुस्तक/ अहवाल कव्हर डिझाईन्स, डिजिटल साईन बोर्ड डिझाईन, मोठ्या आकारातील (होर्डिंग) डिजिटल प्रिंटिगसाठी डिझाईन्स. इ. इ. इ....अनेक प्रकारच्या डिझाईनची कामे सी.डी. आर्ट प्रथम वर्षानंतर विद्यार्थी करु शकतो. शिवाय नोकारी करण्याची इच्छा असल्यास वर्तमानपत्रे, प्रकाशन संस्था, जाहिरात एजन्सी डिजिटल फोटो लॅब, ऑफसेट, रोटो ग्रेव्हियर, पॅकेजिंग प्रिंटिंग प्रेस, इमेज प्रोसेसिंग युनिट्स, डिजिटल प्रिंटिग आदी ठिकाणी त्याना मागणी असतेच. शिवाय तुम्ही ग्राफिक डिझाईनिंगचा स्वतंत्र व्यवसायही सुरु करु शकता.
प्रथम वर्षाच्या सखोल अभ्यासानंतर सी. डी. आर्ट इन टूडी / थ्रीडी एनिमेशन कोर्स केल्यावर तो इंटरॅक्टिव्ह २डी / ३डी प्रेझेंटेशन, एनिमेटेड कार्टुन्स, डॉक्युमेंटरीज, पर्स्पेक्टिव्ह, वॉक थ्रु, थ्रीडी मॉडेलिंग इ.इ. बरीच कामे करु शकतो. याच कौशल्यवर त्याला अनिमेशन इंडस्ट्रिमध्ये मध्ये चांगल्या पगाराची नोकरीही मिळू शकेल. नव्हे मिळतेच. कारण शिक्षण, चित्रपट, जाहिरात व्यापार, उद्योग, सेवा या सर्वच क्षेत्रात अनिमेशनने डोके खुपसल्याने अनिमेटर्सना प्रचंड मागणी आहे.
सी.डी आर्ट कोर्समध्ये कोणकोणती सॉफ्टवेअर्स शिकवली जातात?
ग्राफिक / एनिमेशन, वेबडिझाईनमध्ये कोरल ड्रा, इलस्ट्रेटर, फोटोशॉप, इमेज रेडी, इनडिझाइन, क्वॉर्क एक्स्प्रेस, फ्लॅश, ३डी मॅक्स, माया, कम्बशन, आफ्टर इफेक्ट्स, इलॅस्टिक रिअलिटि, जिफ एनिमेटर, स्विश, फ्रंट पेज, ड्रिम व्ह्यूवर, साउंड फोर्ज, ऑडिशन, फायनल कट प्रो, आदि सॉफ़टवेअर्सचा वापर करतात. परंतू सलग एकापाठोपाठ एक सॉफ्ट्वेअर्स शिकवून विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ होतो. आणि मुख्य विषयांकडे दुर्लक्ष होण्याची भीती असते. ग्राफिक / एनिमेशनमधील मुख्य विषय समजून सांगितल्या शिवाय कोणत्या विषयाची कोणती सॉफ्टवॆअर का वापरायचे?
विविध सॉफ्टवॆअर्समध्ये काय़ फरक असतो आणि मुख्य विषयाच्या सादरीकाणासाठी कोणती सॉफ्टवॆअर नेमके केव्हा आणि किती प्रमाणात वापरायचे असते हे पटवून आणि समजून सांगण्याचा आमच प्रयत्न असतो. जेणेकरुन फायनल प्रोजेक्ट करताना त्याला कसलीही अडचण येऊ नये. तात्पर्य सॉफ्टवॆअर्सच्या गोंधळात मुख्य विषयाकडे दुर्लक्ष होणार नाही याची आम्ही पध्दतशीर काळजी घेतो. तसे पाहिले तर संपूर्ण कोर्समध्ये विषयांचा तुलनात्मक विचार केला तर केवळ २०टक्के भाग हा सॉफ्टवॆअर्सचा आहे. बाकी ८० टक्के भागात विविध विषय येतात. त्यामध्ये निरिक्षण, परिक्षण, विचार करणे, तर्क करणे, कल्पकता, स्केचिस, रंग आणि रंगसंगती, ले-आऊट, डिझाईन, आर्टवर्क, अडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्कील आदी मुख्य विषय असतात.
प्रवेश देताना नोकरीची १०० टक्के गॅरंटी किंवा डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर आपण देता का?
आमच्याकडे शिकून गेलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला (निवडक नव्हे) भेटलात तर तुम्हाला आमची विश्र्वासार्हता दिसून येईल. आणि विश्र्वासार्हता सिध्द झालेली असेल तर गॅरंटीची आवश्यकता नसते. शिवाय पात्रता पाहिल्याशिवाय कोणीही नोकरी देत नसतो. या गोष्टी वास्तव आहेत. या क्षेत्रात क्रिएटिव्ह ग्राफिक डिझाईनर आणि अनिमेटर्सना प्रचंड मागणी आहे हे सर्वद्यात आहे. तेव्हा मुळातच भरपुर उपलब्धता असणार्या नोकरीची गॅरंटी देणे किंवा पात्रता न पाहता अपॉइंमेंट लेटर देणे आम्हाला पटत नाही. पण ज्या क्वालिटीला नोकरी मिळते किंवा स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरु करता येतो अशा क्वालिटीची क्रिएटिव्ह ग्राफिक डिझाईनरला अपेक्षेप्रमाणे कंपनी आणि नोकरी निवडीचे स्वातंत्र्य असते. शिवाय तो नोकरीसाठी कोणत्याच कंपनीला बांधीलही राहत नाही. प्रवेश घेतानाच जो संबंधित कोर्स आणि तिथे शिकविल्या जाणार्या अभ्याक्रमाची चिकित्सकपणे चौकशी करतो. त्याला स्वत:बद्द्ल पूर्ण आत्मविश्वास असतो. म्हणून तो नोकरीच्या किंवा अन्य कोणत्याच अमिषाला बळी पडत नाही.
डिटीपीचा कोर्स करुनसुध्दा फोर कलर जॉब करताना असंख्य शंका आणि अडचणी निर्माण होतात. या शंका आणि अडचणींचे निरसन आपल्या कोर्समधून होईल का?
खरे तर डिटीपी म्हणजे डेस्क टॉप पब्लिशिंग हा विषय खुप मोठा आहे. डिटीपी मध्ये शिकल्या जाणार्या कोर्समध्ये, कोरल ड्रॉ, फोटोशॉप अन पेजमेकर ही सॉफ्टवेअर्स शिकवली जातात. पण केवळ मेनूबार अन टूलबार शिकून काहीच साध्य होत नाही. प्रत्यक्ष जॉब करताना येणार्या अडचणी या वेगळ्या असतात. त्याचे उत्तर त्या सॉफ्टवेअर मध्ये नसते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की कोरल ड्रॉ, अन फोटोशॉपची मूळ संकल्पना काय़ आहे. या सॉफ्टवेअरची नेमकी वैशिष्टे काय आहेत, या सॉफ्टवेअरचा डिझाईनिंगमध्ये नेमका कसा उपयोग होतो. या गोष्टी तपशील वार अन पध्दतशीर समजून घेणे गरजेचे असते. पण डिटीपीच्या कोर्समध्ये नेमके याकडेच दुर्लक्ष झालेले असते, सी.डी. आर्ट कोर्स मध्ये जास्तीत जास्त भर डिझाईनिंगवर दिलेला आहे. जॉब करताना येणार्या अडचणींचा विचार करुन संपूर्ण अभ्यासक्रम बनविला असल्यामुळे तुमचा डिटीपीचा कोर्स झाला असता तरी तुम्हाला प्रत्यक्ष जॉब करताना येणार्या अडचणी आणि शंकांचे निरसन या कोर्समधून नक्कीच होईल.
मला फक्त डिजीटल फोटोग्राफी करावयाची आहे. डिजीटल फोटोग्राफीमध्ये करिअर करावयाची संधी आहे का?
फोटोग्राफी अन डिजीटल फोटोग्राफी यामध्ये फक्त टेक्नॉलॉजीचा फरक आहे. कमर्शिअल डिझाईनिंगला पुर्वी फोटोग्राफीची आवश्यकता हॊती, अन आजही आहे, फोटोग्राफी हा ग्राफिक डिझाईनिंगचा एक महत्वाचा भाग आहे. निव्वळ फोटोग्राफी करणे यापेक्षा कमर्शिअल फोटोग्राफी करणे, अन त्याचा वापर ग्राफिक्स / अनिमेशन करणे हे फायद्याचे आहे. अर्थातच डिजीटल फोटोग्राफीसह डिजीटल आर्ट खूप महत्व आहे, फोटोग्राफीबरोबर यामध्ये इतरही स्कील असावे लागते. विशेष करुन फोटोग्राफी झाल्यानंतर तो फोटोग्राफ आर्टिस्टिक पध्दतीने एडिट करुन त्याला वेगळे रुप देणे हे डिजिटल फोटोग्राफीमध्ये करिअर करण्यापेक्षा डिजिटल फोटोग्राफीसह ग्राफिक्स / एनिमेशनमध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत.
क्रिएटिव्ह डिजीटल आर्ट आणि प्रिंटिंग यांचा संबंध काय?
प्रिंटिंग हे क्षेत्र जाहिरात क्षेत्राशी संबंधीत आहे. स्क्रिन प्रिंटींग, ऑफसेट प्रिंटिंग, फ्लेक्झो प्रिंटिंग, रोटो प्रिंटिंग, रोटो ग्रेव्हियर प्रिंटिंग, आणि डिजिटल प्रिंटिंग यासर्व प्रकारच्या प्रिंटींगसाठी मूळ डिझाईन आणि आर्टवर्क हे क्रिएटिव्ह डिजिटल आर्टिस्टलाच करावे लागते. त्यासाठी प्रिंटिंग प्रोसेसचे द्यान त्याला असावे लागते. सर्व प्रकारच्या प्रिंटिंग प्रोसेसची डिझाईनिंगला आवश्यक असणारी प्रॅक्टिकलसह संपूर्ण माहिती या कोर्समध्ये असल्याने डिझाईन झाल्यानंतर प्रिंटिंगला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.
माझ्या घरी कॉम्प्युटर आहे. आपल्या नोट्स एखादे पुस्तक किंवा पत्रव्यवहाराने हा कोर्स पुर्ण करता येईल का?
पुस्तक वाचून द्यान मिळेल परंतु कला आत्मसाद करण्यासाठी प्रत्यक्ष सराव अन मार्गदर्शनाची गरज आहे. पाण्यात कसे पोहायचे याचे पुस्तक वाचले तर पोहताना करावयाच्या कृतीने द्यान होईल परंतु पुस्तक वाचून पाण्यात उडी मारली तर पोहता येईल का? कलेचे अगदी तसेच आहे. कला म्हणजे स्कील, स्किलसाठी चिंतन आणि सतत अत्यावश्यक असतो. क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट शिकण्यासाठी विशिष्ट प्रकाराची मानसिकता निर्माण व्हावी लागते. ड्राईंग आणि पेंटिंग करताना ज्या मुलभूत गोष्टींची आवश्यकता असते, त्या गोष्टींचे तपशीलवार विवेचन करून विविध सॉफ्टवेअर्सच्या सहाय्याने क्रिएटिव्ह आर्ट शिकवण्यासाठी जो अभ्यासक्रम तयार केला आहे. तो पूर्णपणे प्रॅक्टिकलवर आधारित असून त्यामध्ये मार्केटिंगसह इतर अनेक विषय असलेने हा कोर्स पत्रव्यवहाराने किंवा नोट्स वाचून पुर्ण करता येणार नाही.
मला चित्रकला येत नाही परंतु कलेची आवड आहे. मला हा कोर्स करुन ग्राफिक्स / अनिमेशनमध्ये करिअर करता येईल का?
अर्थातच. सी.डी. आर्ट कोर्समध्ये चित्रकलेची एक स्वतंत्र अभ्यासविषय आहे. कलेची आवड असेल तर ग्राफिक्स / अनिमेशनला आवश्यक तेवढ्या स्केचिसचा अभ्यास सोप्या पध्दतीने आम्ही विद्यार्थ्यांकडून करुन घेतॊ. तेव्हा तुम्हाला चित्रकला येत नाही ही भिती बाळ्गण्याचे कारण नाही. कलेची आवड असणार्याला कल्पना नक्कीच सुचतात. त्या कल्पनांचे चित्रात, जाहिरातीत किंवा अनिमेशनमध्ये रुपांतर करण्यासाठी कॉम्प्युटरमुळॆ आता पुर्वीएवढे श्रम पडत नाहीत. म्हणून आज चित्रकला येत नसली आणि कलेची आवड असेल तर ग्राफिक्स अनिमेशनमध्ये करीअर नक्कीच करता येईल.
कोर्स पूर्ण झाल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरु करावयाचा असल्यास कोणकोणते जॉब कसे व कोठून मिळतात.
कोणत्याही प्रकारच्या व्यवसायासाठी पहिली गरज जाहिरात हिच असते. लोगो, सिम्बॉल, व्ही. कार्ड, लेटहेड, प्रिंटिंगपासून स्टिकर्स, लिफलेट, फोल्डर्स, पॅकेजिंग प्रिंटींगपर्य़ंत आणि इंटरॅक्टिव्ह अनिमेटेड प्रेझेंटेशन सीडी तसेच वेबसाईट बनविण्यासाठी ग्राफिक डिझाईनची गरज असतेच. थोडक्यात कोणत्याही व्यवसाय / उत्पादक / सेवेला ग्राफिक डिझाईनरची गरज असते. एखाद्या उत्पादकाला त्याच्या उत्पादनाच्या पॅकिंग डिझाईनची गरज असेल, एखाद्या इंडस्ट्रीला त्यांच्या कॅटलॉगची गरज असेल तर एखाद्याला पेपरमधील जाहिरातीची गरज असेल. एखाद्या सेवा उद्योगाला त्यांची वेबसाईट बनवायची असते. किंवा एखाद्या बिल्डरला त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या वॉक-थ्रु हवा असेल. प्रिंटिंग स्टेशनरी तर सर्वांनाच लागते. लहान फोटो वरून मोठा फोटो करणे, ब्लॅक- व्हाईट फोटोवरुन कलर फोटो करणे, लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका इ. इ. बारीकसारीक जॉब तर आपल्या आजूबाजूलाच असतात. अन त्यात फायदाही भरपूर असतो.थोडक्यात याक्षेत्रात जॉबची संख्या अधिक असल्यामुळे कोठे न कोठे, कोणत्यातरी जॉबची उपलब्धता असतेच असते. त्यातही चांगले, अन वेळेत काम ना करणार्याकडे कामाचा ओघ सतत सुरु असतो. जॉब मिळवण्यासाठी सुरुवातीला अर्थातच मार्केटिंगची गरज असते. अन या एक वर्षाच्या कोर्समध्ये मार्केटिंग कसे करावे, जॉब कसे मिळवावेत,रेट किती लावावेत याचे परिपूर्ण प्रॅक्टिकल शिक्षण दिले जाते. जेणेकरुन कोर्स पुर्ण केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरु करताना अडचण येणार नाही. आणि हो, ही स्वतंत्र व्यवसायाची डॊकेदुखी नको असल्यास भरपूर पगाराची नोकरी वाट पहात असतेच.
स्वत:च्या स्वतंत्र व्यवसायासाठी किती गुंतवणूक करावी लागेल?
कॉम्प्युटर, डिजिटल कॅमेरा, लाईटस, स्कॅनर, आणि प्रिंटर मिळून साधारण लाख रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरु करता येतो. २५-३० हजारातसुध्दा नुसता कॉम्प्युटर आणि स्कॅनर घेऊन तुम्ही बरीचशी कामे करु शकता. ख्ररंतर संबंधित विषयाचे सखोल द्यान हेच द्यानाच्या जोरावर आजकाल व्यवसाय करणे सोपं झालं आहे.
इंटरनेट काय आहे ? त्याचा वापर ग्राफिक्स / अनिमेशन कोर्समध्ये होतो काय ?
इंटरनेट म्हणजे माहितीचा सागरच आहे. ग्राफिक्स / अनिमेशन शिकत असताना व्यावसायिअकतेवर आमचा जास्त भर असतो. त्यामुळे ग्राफिक्स / अनिमेशन क्षेत्रात जगात काय चालले आहे. या क्षेत्रातील तद्य कशा पध्दतीने काम करतात. याची माहीती सांगताना विविध देशांमधील विविध प्रकारच्या शेकडो जॉब्जचे नमुने विद्यार्थ्याला दाखवणे केवळ इंटरनेट्मुळे शक्य झाले आहे. डिझाईन करताना ऎन वेळी एखादा फोटो किंवा माहिती हवी असेल तर इंटरनेटवर ती त्वरित मिळते. त्यामुळे ग्राफिक्स / अनिमेशनचे कोणतेही काम अडत नाही जगाच्या बरोबरीने जाण्यासाठी इंटरनेटचा वापर अगदी अपरिहार्य झाला आहे. म्हणूनच कोर्स कालावधीत आमचे सर्व कॉम्प्युटर इंटरनेटला जॊडलेले असतात. ग्राफिक्स / अनिमेशन क्षेत्रात इंटरनेटचा वापर कसा करतात हा विषय आमच्या अभ्यासक्रमातच असल्याने आमचा विद्यार्थी नेहमी जगाबरोबर असतो.
सी.डी. आर्ट ईन ऑडव्हर्टायझिंग अण्ड प्रिंटींग या एक वर्षाच्या कोर्सचे स्वरुप कसे आहे.
मागील विवेचनावरुन आपल्या लक्षात आले असेल की, ऑडव्हर्टायझिंग- प्रिंटींगसाठी डिझाईनिंगचा पाच- पाच वर्षे अभ्यास करुन सुध्दा विद्यार्थी डिजिटल डिझाईनिंगच्या बाबतीत अद्यानी राहतो व त्याला प्रत्यक्ष जॉबसाठी कुठेही गेलात तरी कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या क्षमतेविषयी विचारणा होते आणि त्याचे उत्तर बहुदा नकारात्मकच असते. याचाच अर्थ असा की ऑडव्हर्टायझिंग आणि प्रिंटींगसाठी ग्राफिक डिझाईनिंग करताना कोरल ड्रा / फोटोशॉप माहित असून चालत नाही. तर त्याही पुढे जाऊन ऑडव्हर्टायझिंग, प्रिंटींग समजावून घेणे आणि ग्राफिक डिझाईनिंग म्हणजे नेमके काय, हे शिकणं महत्वाचं आहे, मार्केटिंगचं द्यान, संभाषण कौशल्य, मानसशास्त्र, या विषयांचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. म्हणुनच या सर्व गोष्टीचा विचार करुन कोणताही अन कितीही अवघड जॉब स्वतंत्रपणे हॅडल करण्याची क्षमता आणि पूर्ण आत्मविश्वास निर्माण करणारा आम्ही अभ्यासक्रम बनविला आहे. जेणेकरुन हा एक वर्षाचा कोर्स पुर्ण केल्यावर विद्यार्थि डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊन जॉब मिळवून ति क्लाएंटच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण करुन दॆऊ शकेल. या एक वर्षाच्या कोर्स मध्ये जाहिरात म्हणजे काय, प्रिन्ट मिडियातील जाहीरातींचे प्रकार, कमर्शिअल डिजिटल फोटोग्राफी, फोटोफिनिशिंग, विविध प्रकारच्या प्रिन्ट प्रकारासाठी लेआऊट, डिझाईन, आर्टवर्क करण्याच्या पध्दती, डिझाईन आर्टवर्कमधील बारकावे, रंगसंगती, काम्पोझिशन इ. इ.. अनेक गोष्टींचा तपशीलवार अभ्यास पूर्णपणे प्रत्यक्ष प्रक्टिकलवर आधारित करुन घेतला जातो. क्लाएंट्कडे जाऊन जॉब मिळवणे, तो खात्रीपूर्वक पूर्ण करणे, जॉबची डिलिव्हरी देणे, बील करणे ह्या सर्व प्रोसेस या एक वर्षाच्या अभ्यासक्रमात आहेत. त्यामुळे हा कोर्स पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष जॉब करताना कसलीही अडचण येणार नाही. शिवाय २डी / ३डी एनिमेशनसाठी उपयोगी असणारा जवळ जवळ ७० टक्के भाग हा या एक वर्षाच्या अभ्यासक्रमात पूर्ण होतो. त्यामुळे आर्टेकच्या द्वितीय वर्ष सी. डी. आर्ट इन २डी / ३डी एनिमेशनसाठी त्याला सहज प्रवेश मिळतो.
हा कोर्स शिकविणारे प्रशिक्षक कोण आहेत? आणि त्यांचा या क्षेत्रातील अनुभव काय?
ऑडव्हर्टायझिंग, फोटोग्राफी, प्रिंटिंग, ग्राफिक्स / अनिमेशन क्षेत्रात मॅन्युअल आणि डिजिटल डिझाईनिंगचा प्रत्येकी सुमारे २० वर्षाहून अधिक अनुभव असणारे भागवत पवार हे ग्राफिक्स / अनिमेशनमधील डिजिटल आर्ट आणि अमर परब हे विज्युअल आर्ट्चे प्रमुख प्रशिक्षक आहेत. तसेच याक्षेत्रातील दीर्घ अनुभवी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबईचे माजी प्राचार्य अनंत कुलकर्णी हे क्लासिकल स्केचिंग अण्ड पेंटीग आर्ट आणि प्रख्यात व्यंगचित्रकार, लेखक आणि व्यक्तीमत्व विकास मार्गदर्शक विवेक मेहेत्रे हे वेब डिझाईनिंग, २डी / ३डी एनिमेशन टेक्निक्स शिकवणार आहेत. शिकत असताना येणार्या शंकांचे जागेवरच निरसन करणॆ, विषयाच्या मुळाशी जाऊन शिकविणे आणि आवश्यक असेल तिथे डेमो दाखवून शिकविण्याच्या पध्दतीमुळे कोर्स पूर्ण झाल्यानंतर ग्राफिक्स / एनिमेशनबद्द्ल कोणतीही शंका रहात नाही. कोर्स झाल्यानंतर सुध्दा प्रत्यक्ष जॉब करत असताना काही शंका किंवा अडचण आल्यास त्याचेही निराकरण केले जाते. त्यामुळे जॉब करताना मनात कोणतीही भिती राहत नाही. कोणत्याही पुस्तकात किंवा हेल्पमध्ये नसलेली पध्दतशीर व अचूक ग्राफिक्स / एनिमेशनची गुपिते शिकण्याची ही संधी महाराष्ट्रात एकमेव आर्टेक डिजिटलमध्ये उपलब्ध आहे.
क्रिएटिव्ह डिजिटल आर्टला प्रवेश घेण्यासाठी काय पात्रता हवी?
चित्रकला, फोटोग्राफी, जाहिरात, सिनेमा किंवा प्रिंटिंग क्षेत्राची आवड, सौंदर्याद्रुष्टि, गणित- भूमितीचे पुरेसे द्यान, चिकित्सक व्रुत्ती, विषय समजून घेण्याची कुवत, चिकाटी आणि काहीतरी नवीव करण्याची प्रबळ इच्छाशक्ती एवढी पात्रता असेल तर सी. डी आर्ट या ग्राफिक्स / अनिमेशन कोर्सला प्रवेश मिळतो. आणि कोर्स पूर्ण केल्यानतंर विद्यार्थी ऑडव्हर्टायझिंग, फोटोग्राफी, प्रिंटींग, अनिमेशन आणि इंटरनेट क्षेत्रात ग्राफिक डिझाईनर / अनिमेटर म्हणून एक चॅलेजिंग करिअर करतो. बेसिक कॉम्प्युटर ऑपरेटिंग कोर्स, इंटरमिजिएट ड्राइंग ग्रेड परिक्षा, ऎ.टी.डी किंवा जी. डी. आर्ट पुर्ण केलेल्या विद्यार्थ्याना प्रवेशासाठी प्रथम प्राधान्य दिले जाते.
सी.डी. आर्ट कोर्ससाठी कोर्स फी व्यतिरिक्त कोणत्या कोर्स मटेरिअलची आवश्यकता आहे? त्याचा अंदाजे खर्च किती होतो?
हा कोर्स पूर्णपणे प्रॉक्टिकलवर आधारित असल्याने केलेल्या कामाच्या कलर प्रिंटस, इनडोअर / आऊटडोअर स्केचिंगसाठी स्केच पॅड, कोरे पेपर, कॅलिग्राफी पेन, युएसबी पेन ड्राईव्ह, सीडीज, पोर्टफोलिऒ, रेफरन्स, आऊटडोअर युनिफॉर्म, इ. साठी वर्षात साधारण ४ ते ५ हजार रु. आणि वर्षातून एकदा ३ दिवसाच्या स्टडी टूरसाठी अंदाजे रु. १५००/- इतका खर्च येतो. एक्स्ट्रा असाईनमेंट आणि अधिक सरावासाठी घरी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर उत्तम.
परगावच्या विद्यार्थांसाठी राहण्यासाठी आणि जेवणासाठी सोय आहे का? त्यासाठी किती खर्च येईल?
परगावच्या विद्यार्थाना राहण्यासाठी स्वतंत्र सोय असून राहणे आणि जेवणासह माहिन्याला अंदाजे रु. १८००/- इतका खर्च येतो. हा खर्च ज्याचा त्याने करावयाचा आहे.
खरंच एक वर्षात विद्यार्थी कमवायला शिकतो का?
होय , कारण कोर्सचा संपूर्ण अभ्यास हा केवळ प्रॉक्टिकलवर आधारीत असून थेअरी किंवा परिक्षेसाठी एकही पुस्तक ठेवलेले नाही. त्यामुळे पाठांतर करुन फक्त परिक्षेसाठी अभ्यास करण्याची व्रुत्ती निर्माण होत नाही. प्राक्टिकल करवून घेत असतानाच थोडक्यात महत्वाच्या नोट्स दिल्या जातात. कोर्स झाल्यानतंर नोकरीच्या ठिकाणी किंवा स्वत:च्या व्यवसाय करीत असताना विविध प्रकारचे जॉब विद्यार्थाला ज्या पध्दतीने करायचे असतात त्याच पध्दती प्रॉक्टिकल मध्ये शिकविल्या जातात. डिजिटल तंत्रद्यानाचा शास्त्रशुध्द उपयोग क्रुन कमीत कमी वेळेत क्वालिटी जॉब कसे करायचे, व त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरचा अचुक वापर कसा करावा, थोडक्यात मार्केटमधील इतर समव्यावसायिक ज्या क्वालिटीचे जॉब करतात किंबहुना त्यापेक्षा अधिक चांगल्या क्वालिटीचे जॉब तंत्रशुध्द कसे करायचे असतात याचा अभ्यास या कोर्समध्ये आहे. अड एजन्सीमध्ये किंवा एखाद्या अनिमेशन स्टुडिओमध्ये क्लाएंट्च्या जाहिराती किंवा प्रोडॉक्शन जॉब करण्यासाठी ज्या ज्या पध्दती वापरतात. त्यापैकी योग्य तपशीलवार अभ्यास या कोर्स मध्ये आहे. उदा. जाहिरातीसाठी कल्पना कशा सुचतात, विषयानुसार जाहिरातीमध्ये हॆडलाईन कशी असावी, कॉपीमॅटर कसा लिहावा, डिझाईनची रचना आणि रंगसंगती कशी असावी, कल्पनेला अनुसरुन फोटोग्राफी कशी करावी, २डी / ३डी प्रेझेंटॆशनमध्ये सुरुवात, मध्य आणि शेवट कसा असावा. इ. इ. इ... कोर्स नंतर विद्यार्थाला व्यवसाय करायचा असल्यास मार्केटिंग करुन जॉ ब कसे मिळवायचे, जॉबची सुरुवात कशी करायची, जॉबचा रेट काढणॆ, योग्य फायदा ठेऊन कोटेशन देणे.क्लाएंटशी कसे बोलावे, कसे वागावे, क्लाएंटकडून जॉब फायनल करुन घेणे. प्रिटिंग, एनिमेशन, इंटरनेटसाठी योग्य असे आर्टवर्क बनविणे, जॉबची डिलिव्हरी करणे, बिल करणे, रिसीट देणे, हिशोब ठेवणे, व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणे, इ. इ. इ. तपशीलवार अभ्यास या कोर्स मध्ये आहे. कोर्स संपल्यावर जेव्हा विद्यार्थी नोकरी किंवा व्यवसाय सुरु करतो तेव्हा एखाद्या जॉबमध्ये त्याला काही अडचण आल्यास त्याला योग्य मार्गदर्शन करुन ती अडचण किंवा शंका दूर केली जाते. हा सपोर्ट त्याला आयुष्यभर विनामुल्य मिळतो.
प्रथम वर्ष सी.डी. आर्ट इन अडव्हर्टायझिंग अण्ड प्रिंटींगच्या टुडी / थ्रीडी एनिमेशन आणि वेब डिझाईनची काही संबंध आहे का?
टुडी / थ्रीडी एनिमेशन आणि वेब डिझाईनसाठी आवश्यक असणारे ग्राफिक्स, कलर स्केचीस, कांम्पोझिशन, ड्राईंग, फोटो एडिटींग-मिक्सिंगबरोबर कल्पकता आणि कलात्मक द्रुष्टी निर्माण करण्यासाठीचा अभ्यास प्रथम वर्ष सी.डी आर्ट कोर्समध्ये असतो. म्हणजेच कल्पकता आणि कलात्मक द्रुष्टी निर्माण होणे हाच अनिमेशन आणि वेब डिझाईनचा पाया आहे. म्हणुनच ज्यांचा प्रथम वर्ष सी.डी. आर्ट इन अडव्हर्टायझिंग अण्ड प्रिंटींग कोर्स झालेला आहे. त्यांनाच आम्ही टुडी / थ्रीडी एनिमेशन किंवा वेब डिझाईनला प्रवेश देतो.
आपले सर्टिफिकेट मिळते का/ नोकरी मिळविण्यासाठी या सर्टिफिकेटचा उपयोग होतो का?
कोणत्याही कोर्स केल्यानंतर त्या त्या संस्थेचे सर्टिफिकेट मिळतेच. आमचेही मिळते. पण तुम्ही कुठे शिकला किंवा तुमच्याकडे कोणते सर्टिफिकेट आहे. याला नोकरी मिळण्याच्या द्रुष्टीने काही महत्व नाही. कारण लक्षात ठेवा नोकरी मिळणे हे सर्टिफिकेट पेक्षा कोर्स कालावधित केलेल्या कामांवर अवलंबून असते. तुम्ही स्वत: पुर्ण केलेला पोर्टफोलिओ हेच खरे सर्टिफिकेट असते. मुलाखतीच्या वेळी पोर्टफोलिओ प्रत्यक्ष करवून घेतले जाणारे संबंधित प्रॉक्टिकल वर्क पाहूनच तुमची निवड होते.
आजपर्यंत किती विद्यार्थांनी सी.डी आर्ट कोर्स पूर्ण केला आहे? आणि ते आज काय करतात?
कोल्हापूरसह, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर, तुळजापूर, पंढरपूर, हिगोंली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, बेळगांव आदी ठिकाणांहून येऊन २०० वर विद्यार्थांनी सी.डी आर्ट हा कोर्स पूर्ण केला आहे. आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी आज स्वत:च्या पायावर उभे आहेत पैकी काहीजण टाटा ईलेक्सी, मुंबई. एनिराईटस, बेंगलोर (आता पुणे). नझारा टेक्नॉलॉजी, मुंबई. अल्फ डिझाईन कन्सल्टन्सी, पुणे आदी नामंकित कंपन्यांमध्ये ग्राफिक डिझाईनर म्हणुन मोठ्या पगारावर नोकरी करतात. काहीजण जाहिरात एजन्सीज, वृतपत्रे, पॅकॅजिंग इंडस्ट्रीज, डिजिटल प्रिंटर्स आदी ठिकाणी नोकरीस आहे. तर बर्याच विद्यार्थ्यांनी स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला आहे. थोडक्यात सी.डी. आर्ट म्हणजे केवळ नोकरीची नव्हे तर परिपूर्ण करिअरची हमी असेच समीकरण झाले आहे. (सी.डी. आर्ट पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट ऑफिसवर उपलब्ध आहे.)
प्रथम वर्ष सी.डी आर्टसाठी प्रवेश प्रक्रिया कशी आहे.
कोर्स आणि संबंधित करिअरची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर माहिती पत्रकासोबत असलेला प्रवेश अर्ज भरुन द्यावा. सोबत रु. ५०००/- सह १० वी / १२ वी मार्कलिस्ट आणि रेशन कार्ड झेरॉक्स आवश्यक. इलेमॆंटरी / इंटरमिडिएट ड्रॅईग ग्रेड परिक्षा / जी.डी आर्ट / ए.टी.डी किंवा चित्रकलेसंबंधित इतर सर्टिफिकेट असल्यास जोडावीत. प्रवेश मिळाल्यानंतर उर्वरित फी भरुन प्रवेश निश्चित करावयाचा आहे.
मला फक्त अनिमेशन शिकाय़चे आहे. तुमच्याकडे डायरेक्ट टूडी / थ्रीडी अनिमेशन किंवा वेब डिझाईनिंगला प्रवेश मिळेल का?
आमच्याकडे डायरेक्ट टूडी / थ्रीडी अनिमेशन किंवा वेब डिझाईनिंगला प्रवेश मिळत नाही. क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट इन अडव्हर्टायझिंग अण्ड प्रिंटींग या परिपूर्ण ग्राफिक डिझाईनच्या कोर्सनंतर विद्यार्थी खालील पैकी आवडीनुसार कोणत्याही एका कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतो.
क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट इन टूडी अनिमेशन- १ वर्ष.
किंवा
क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट इन थ्रीडी अनिमेशन- १ वर्ष.
किंवा
क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट इन वेबडिझाईनिंग - १ वर्ष.
कारण या तीनही कोर्सेससाठी अत्यंत आवश्यक असलेला अभ्यास(उदा.ग्राफिक डिझाईन, आर्टवर्क, अडव्हर्टायझिंग, कलर थेअरी, कॉपीरायटिंग, काम्पोझिशन, क्रिएटिव्हिटी, स्केचिस, फोटोग्राफी, फोटोमिक्सिंग, कॅलिग्राफी, इमेज एडिटींग, इ. इ. इ. ) पहिल्या वर्षी झालेला असतो. आणि या अभ्यासाच्या आधारेच विद्यार्थी टुडी किंवा थ्रीडी एनिमेशनच्या संबंधित सॉफ्टवेअर्समध्ये कॅरॅक्टर डेव्हलपमेंट, मॉडेलिंग, कलरिंग, रेंडरिंग, रिगिंग, टेक्चरिंग, बॅकग्राऊंडस, विज्युअल इफेक्ट आदी सार्या गोष्टी उत्तम प्रकारे करु शकतो. ग्राफिक्स / अनिमेशनमधील एखाद्या पार्ट नव्हे तर संपूर्ण प्रोजेक्ट तो स्वत:च्या जबाबदारीवर पूर्ण करु शकेल एवढा अभ्यास आम्ही विद्यार्थ्याकडून करुन घेतो. डायरेक्ट अनिमेशन प्रवेश घेऊन केवळ सॉफ्टवेअर्स शिकुन हे शक्य नसते.
कोर्सेस, कालावधी, बॅचेसच्या वेळा आणि अभ्यासक्रमाचे स्वरुप:
क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट इन अडव्हर्टायझिंग अण्ड प्रिंन्टिंग,
कालावधी एक वर्ष- जुलै ते एप्रिल
(आठवड्यातून पाच दिवस मंगळवार ते शनिवार : रोज दोन तास)
कोर्स फी : रु. ३६०००/- (एकदम भरल्यास)
हप्त्याने : प्रवेश घेतेवेळी रु. १०,०००/- आणि रु. ४०००/- चे ८ पोस्ट डेटेड चेक्स)
एका बॅचमध्ये फक्त १० विद्यार्थी.
टिप:- सी.डी. आर्ट इन अडव्हर्टाझिंग अण्ड प्रिंटींग हा अत्यंत महत्वाचा कोर्स असून एनिमेशन आणि वेब डिझाईनचा पाया या वर्षी पूर्णत: पक्का करुन घेतला जातो. जसे की, ग्राफिक डिझाईन, कलर, लेआऊट, स्केचिस, कल्पकता, कॉपी रायटिंग आदी गोष्टींचा शास्त्रशुध्द पध्दतीने अभ्यास करुन याचा उपयोग जाहिरात आणि प्रिटिंग क्षेत्रात कसा केला जातो. पर्यायाने जाहिरातीचे प्रकार आणि प्रिटिंगच्या विविध पध्दती, जाहिरात / प्रिटिंगसाठी आवश्यक असणारी फोटोग्राफी, फोटोग्राफीचे प्रकार, आर्टवर्क करण्याच्या पध्दती आदी गोष्टींचा प्रॅक्टिकल अभ्यास कोर्समध्ये असल्याने या एक वर्षानंतर नोकरी किंवा घरच्या घरीच ग्राफिक डिझाईनची कामे करुन विद्यार्थी कमवायला लागतो. म्हणजे पैसा कमवत त्याने व्दितीय वर्ष सी.डी.आर्ट हा अडव्हान्स अनिमेशनचा कोर्स करावा हा त्यामागील आमचा शुध्द हेतू आहे. सर्वार्थाने परिपूर्ण ग्राफिक डिझाईनर / अनिमेटर होण्याच्या द्रुष्टीने या प्रथम वर्ष सी.डी.आर्ट चा थोडक्यात अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे -
मला कलेची आवड आहे पण माझ्याजवळ वेळ नाही. डिझाईनचा एखादा शॉर्ट-टर्म कोर्स आपल्याकडे आहे का?
ज्यांच्याजवळ वेळ नाही अशा विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गॄहिणी आणि प्रौढांसाठी २ महिन्याचा हॉबी कोर्स आहे. त्यामध्ये कोरल ड्रा आणि फोटोशॉप या सॉफ्टवेअर्समध्ये डिझाईन करण्याच्या सोप्या पध्दती आहेत.त्यामध्ये संगणकीय चित्रकला आणि ग्राफिक डिझाईन म्हणजे काय? जाहिरातीची डिझाईन्स कशी बनवितात? डिजिटल फोटोग्राफी, दोन किंवा अधिक फोटोंचे कलात्मक फोटो- मिक्सिंग कसे करतात? यांचा प्रत्यक्ष प्रॅक्टिकल अभ्यास आहे.
कालावधी ४४ दिवस (आठवड्यातून पाच दिवस: रोज दोन तास)
कोर्स फी फक्त: रु. ६०००/- प्रवेश घेतेवेळी.
बदललेल्या काळानुसार परिक्षेचे स्वरुप- करा किंवा मरा.
प्रथम वर्षानंतर जेव्हा विद्यार्थी नोकरी / व्यवसाय सुरु करणार किंवा द्वितिय वर्षासाठी अनिमेशनला प्रवेश घेणार तेव्हा त्याला प्रोजेक्टच्या द्रुष्टीने उपयोगी पडणार्या सवयी प्रथमपासूनच लागल्या पाहिजेत त्या द्रुष्टीने निरिक्षण ही महत्वाच गोष्ट आहे. निरीक्षणशक्ती हे आर्टिस्टचे मुल्भूत वैशिष्टे आहे. कोणत्याही गोष्टीकडे, विषयाकडे, व्यक्तीकडे, घटनेकडे पाहताना त्याकडे चिकित्सक वृत्तीने पाहणे त्याला जमलेच पाहिजे. अशा कोणत्याही गोष्टीकडे वर वर पाहणारा कधी आर्टिस्ट बनणार नाही हे लक्षात ठेवा. ग्राफिक डिझाईनर हा चौकस बुध्दीचा असलाच पाहिजे. कोणत्याही विषयाकडे गांभिर्याने पाहणारा आणि प्रत्येक घटनेतून योग्य अर्थ काढणारा पाहिजे. त्यासाठी मी आज काय पाहिले, काय वाचले, काय अनुभवले अन काय शिकलो यावर त्याने दैनंदिनी लिहिलीच पाहिजे. यामुळे त्याला विचार करण्याची सवय लागेल अन याचा उपयोग प्रोजेक्टसाठी कल्पना सुचवण्यासाठी होईल. एकाच द्र्ष्याचे वेगवेगळ्या विद्यार्थांनी लिहिलेले वर्णन वेगवेगळे असेल. त्यातूनच एखाद्या विषयाकडे किंवा घटनेकडे विविध बाजूंनी पाहण्याची त्याला सवय लागेल. ग्राफिक डिझाईनरचा व्यवसायच मुळी अनेक प्रकारच्या रेफरन्सवर अवलंबून असतॊ.रेफरन्स म्हणजे डिझाईन करताना लागणारे संदर्भ. त्यामध्ये फोटो, चित्रे, साहित्य, माहिती, चांगल्या जाहिरातींची कात्रण इत्यादि गोष्टींचा समावेश होतो. एखाद्या साध्या रेफरन्ससाठी एखादे डिझाईन अडून राहते आणि काम वेळेत देता येत नाही. व्यवसाय करीत असताना रेफरन्सशिवाय अडू नये म्हणून कोणकॊणते रेफरन्स गोळा करावेत हा सुध्दा एक महत्वाचा अभ्यास विषय या कोर्समध्ये आहे आणि आऊटडोअर स्टडीमध्ये असे रेफरन्स गोळा करण्याचाही एक भाग आहे. या कोर्सच्या अभ्यासक्रमात कॊणतेही पुस्तक नाही. वर्षभर दिलेल्या नोट्स व केलेल्या कामावर आधारित थेअरीचा पेपर (१०० गुण) आणि ग्राफिक डिझाईनिंग / अडव्हर्टायझिंग / एनिमेशन चा एक प्रॅक्टिकल पेपर (१०० गुण) असे दोन पेपर दरवर्षी परिक्षेसाठी असतील. प्रत्येक दिवसाची हजेरी, होम वर्क, आणि वर्षभराच्या कामातील सातत्य यावर आधारित १०० गुण. अशा एकूण ३०० गुणांपैकी पास होण्यासाठी किमान १८० गुण (६० टक्के) मिळणे आवश्यक आहे.
टिप:-
* आमची कोठेही शाखा नाही.
* ग्राफिक्स / एनिमेशनचा सी. डी. आर्ट हा पूर्णपणे व्यावसायिक आणि संपूर्ण प्रॅक्टिकलवर आधारित कोर्स असल्याने या क्षेत्रामध्ये अचुक जॉब करण्याच्या पध्दती आणि जॉब करताना प्रत्यक्ष येणार्या अडचणींचा विचार करुनच अभ्यासक्रम बनविला आहे.
* पाठांतर करण्यापेक्षा समजुन घेऊन प्रॅक्टिकल जॉब करण्यावर भर दिलेला आहे.
* जाहिरात, फोटोग्राफी, प्रिंटींग आणि अनिमेशन क्षेत्रात कोणताही जॉब करु शकणारा ’परिपूर्ण ग्राफिक डिझाईनर / एनिमेटर’ बनवणे हा या कोर्सचा उद्देश आहे.
* सी. डी. आर्ट हा कोर्स पूर्णपणे स्वतंत्र असून तो कोणत्याही संस्थेशी अथवा विद्यापिठाशी संलग्न नाही.
* कोर्सचे स्वरुप आणि उद्देश पूर्णपणे समजल्यानंतरच प्रवेश घ्यावा.
* कोर्स कालावधीत कोणत्याही कारणास्तव गैरहजर राहता येणार नाही.
* प्रवेश देताना परीक्षेतील गुणांपेक्षा विद्यार्थ्यांची मानसिकता आणि कलेची आवड यांना प्राधान्य दिले जाईल.
* या माहिती- पत्रकात कोर्सची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही शंका असल्यास प्रत्यक्ष येऊन भेटावे.
* प्रवेश घेताना पालक आणि विद्यार्थ्याने स्वत: येणे आवश्यक आहे.
* प्रवेश देणे अगर नाकारण्याचा अधिकार आर्टेक डिजिटलचा राहिल.
* प्रवेश प्रक्रिया सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायं. ७ या वेळेत सुरु आहे.
ग्राफिक्स /अनिमेशन कोणत्याहि संस्थेत प्रवेश घेताना कोर्सकालावधीत विद्यार्थ्यांनीच केलेल्या विविध प्रकारच्या कामांचे नमुने पाहावेत. कोर्स पुर्ण करुन नोकरी / व्यवसाय करणार्या विद्यार्थ्यांची लिस्ट मागून घ्यावी. त्यांना भेटून त्यांचे अनुभव ऎकावेत. त्यांची मिळकत पाहावी आणि मगच प्रवेश घ्यावा. कारण प्रश्न विद्यार्थ्यांच्या करिअरचा आहे. प्रश्न जीवनाचा आहे. प्रश्न विचार करुन योग्य निर्णय घेण्याचा आहे.
बॅचेसच्या वेळा:
ग्राफिक्स / एनिमेशन: एक मनोरंजक करिअर - १
सकाळी ०८.०० ते १०.३० आणि ११.०० ते ०१.३०
दुपारी ०३.०० ते ०५.३० आणि ६.०० ते ०८.३०
ग्राफिक्स / एनिमेशनला प्रवेश घेण्यापुर्वीच विद्यार्थ्याला या क्षेत्राशी संबंधित करिअरची परिपूर्ण माहिती व्हावी. आणि कोणतीही दिशाभुल न होता योग्य ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी त्याला मार्गदर्शन मिळावे या हेतुने दै. पुढारी करिअरमध्ये भागवत पवार याची लेखमाला प्रसिध्द झाली होती. ती ज्यांनी वाचली नसेल त्यांच्यासाठी जशीच्या तशी येथे देत आहोत.
ग्राफिक्स / एनिमेशन : एक मनोरंजक करिअर - १
अनिमेशन इंडस्ट्री म्हणजे अडव्हान्स फिल्म इंडस्ट्री म्हटले तरी चालेले. पण अनिमेशन इंडस्ट्रीची व्याप्ती केवळ फिल्म इंडस्ट्रीपेक्षा खूपच मोठी आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता एनिमेशनचा वापर करुन स्पेशल इफेक्ट्सची निर्मिती केली जाते. पण फिल्म इंडस्ट्रीशिवाय जे पण काही इतर उद्योग व्यवसाय आहेत त्या प्रत्येक उद्योग व्यवसायात एनिमेशनने डोके खुपसले आहे. करिअयरच्या द्रुष्टीने अनिमेशनची व्याप्ती समजून घेऊन त्यामध्ये कॊणी नेमके काय शिकायचे आणि ते शिकून कोणती नोकरी मिळवायची हे ज्या त्या विद्यार्थ्याच्या कुवतीनुसार ठरते. किंबहुना विद्यार्थ्याने स्वत:ची कुवत ऒळखून योग्य तो कोर्स निवडला तरच त्याचा त्याला चांगला फायदा होतो. नोकरीचे आश्वासन आणि कोर्सची लांबलचक नावे वाचून प्रवेश घेणे धोकादायक ठरु शकते. योग्य तो अनिमेशनचा कोर्स करुन त्याला विशेष प्राविण्य मिळवले तर नोकरी ही मिळतेच मिळते. त्यासाठी आश्वासनाची किंवा संस्थेच्या शिफारशीची गरज लागत नाही.किंवा नोकरी मिळवण्यासाठी डोनेशनच्या रुपात लाच द्यावी लागत नाही. संपूर्ण पारदर्शक असणार्या या क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या पात्रतेनुसार योग्य त्या पगाराची नोकरी मिळतेच. किंवा स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय करायचा असेल तर संबंधित व्यवसायही सुरु करता येतो. म्हणजे ’नोकरी करा किंवा व्यवसाय करा’ हे करियरच्या द्रुष्टीने या क्षेत्राचे वैशिष्ट्ये आहे. पण भरपूर मिळत असल्याने बहुतेकांचा कल हा नोकरी करण्याकडे जास्त असतो. ग्राफिक्स / अनिमेशन क्षेत्रात आवश्यक असलेल्या अनेकविध कलांपैकी कोणत्याही एका कलेमध्ये स्वतंत्र करिअर घडू शकते. यावरुन या क्षेत्रातील करिअरच्या संधींची व्याप्ती लक्षात येते. संपूर्ण चित्रपट निर्मिती ही जशी केवळ एक व्यक्ती करु शकत नाही त्यासाठी विविध कौशल्ये प्राप्त केलेले कलाकार आणि विविध बुध्दीमत्तेचे अनेक कलाकार आणि तंत्रद्यांची आवश्यकता असते. म्हणून ग्राफिक्स / एनिमेशन क्षेत्रात मला नेमके काय आवडते आणि मला कोणती गोष्ट जमेल याचा कोर्सला प्रवेश घेण्याआधीच विचार करायला हवा. म्हणून विद्यार्थ्याला करियरच्या द्रुष्टीने ग्राफिक्स / एनिमेशन क्षेत्रात विचारपूर्वक निर्णय घेता यावा यासाठी त्याला तपशिलवार माहिती मिळणे गरजेचे आहे असे मला वाटते. अनिमेशनचे शिक्षण देणार्या विविध संस्था आणि त्यांचे प्रथमदर्शी देखावे पाहून कोणत्या संस्थेत प्रवेश घ्यावा ? हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडतॊ. कोर्सची विविध नावे आणि त्यामध्ये शिकवल्या जाणार्या सॉफ्टवेअर्सची लांबलचक यादी पाहून पुन्हा गोंधळ. केवळ नोकरीची १०० टक्के हमी या एकाच बेसवर कौन्सिलर सांगेल त्या कोर्सला प्रवेश घेऊन विद्यार्थी आणि पालक मोकळे होतात. पण ग्राफिक्स / अनिमेशन संबंधी संपूर्ण माहिती, फायदे-तोटे, अभ्यासक्रम, पात्रता आदी गोष्टी समजून घेऊन प्रवेश घेणारे विद्यार्थी खूपच कमी असतात.
ग्राफिक्स / एनिमेशन क्षेत्रासंबंधीत बातम्या, लेख, आणि करिअरच्या संधी वाचून, चित्रपटतील एनिमेटेड रंजक द्रुष्ये, टूडी कार्टून फिल्मस, थ्रीडी वर आधारित चित्रपट आणि जाहिरातींमधील अदभूत आणि आकर्षक द्रुष्ये पाहून उत्सुकतेपोटी या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा सर्वांचीच होते. कारण करिअरसाठी एनिमेशनसारखे मनोरंजक आणि प्रभावी क्षेत्र दुसरे कोणतेही नाही, हे निश्चित. पण तरीही कोणी ही मनात आणावे आणि अनिमेशन शिकावे एवढे सोपेही ते नाही हे नक्की. पण १०वी- १२वी नंतर विद्यार्थ्यांसाठी अनिमेशन हे क्षेत्र खरे तर एक गरज, उपयोगिता, संधी, यासाठी वापरण्यात येणारी सॉफ्टवेअर्स, प्रवेश घेताना घ्यावयाची काळजी आदी गोष्टींची तपशीलवार माहिती पुढील लेखापासून..................
ग्राफिक्स / एनिमेशन : एक मनोरंजक करिअर - २
कोणत्याही क्षुल्लक वाटणार्या गोष्टीकडे गांभिर्याने आणि सुक्ष्म द्रुष्टीने पाहिल्यास त्या गोष्टीचे महत्व लक्षात येते. अशा क्षुल्ल्क वाटणार्या पण महत्वाच्या अनेक गोष्टींचे एकत्रीकरण करुनच एखादी भव्य कलाकॄती निर्माण होत असते. कोणत्याही गोष्टींचे महत्व हे जरी सापेक्ष असेल तरी अनिमेशनच्या द्रुष्टीने महत्वाच्या असणार्या खुप गोष्टी आहेत.किंबहुना प्रवेश घेण्यापुर्वी त्या समजून घेतल्या तर स्टेप बाय स्टेप एनिमेशनपर्य़ंत पोहोचता येतो. ’मी डायरेक्ट एनिमेशनला प्रवेश घेऊन एनिमेटर हॊणार’ असे म्हणणे म्हणजे ’शाळा कॉलेजला जाता डॉक्टरेट मिळवणार’ असे म्हटल्यासारखे आहे. ग्राफिक्स / एनिमेटशन क्षेत्र आहे. मुळी इंटरेस्टिंग, पण प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थाने स्वत:ला तपासून घेण्याची गरज आहे. कारण प्रवेश देताना कोणी विद्यार्थ्याची पात्रता तपासत नाहीत. आणि एकदा भरलेली फी सहसा परत मिळत नाही. म्हणून पुढे उल्लेख करित असलेल्या सर्वच गोष्टींचा गांभिर्याने विचार आणि कॄती करुन संस्थेची, पर्यायाने संबंधित अभ्यासक्रम, तो शिकविणार्या फॅकल्टीची पात्रता तपासा आणि मगच प्रवेश घ्या. देखावा, आश्वासने आणि नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका
निरिक्षण करणे :- निरिक्षण हा कोणत्याही कलेचा पाया आहे. डोळ्यासमोर दिसणार्या कोणत्याही द्रुष्ट्याकडे वरवर पाहून काही उपयोग नसतो. पाहणे आणि द्रुष्टी असणे यामध्ये फरक आहे. कोणत्याही गोष्टीचे, अवती-भोवती घडणार्या प्रसंगाचे सुक्ष्म निरिक्षण करणे ही ग्राफिक्स / अनिमेशनची प्राथमिक गरज आहे. जन्मत:च निरिक्षणाला सुरुवात होते. पाहून आणि ऎकूनच व्यक्ती बरेच काही शिकत असते. मिळणारा प्रत्येक अनुभव हा नव-निर्मितीचे रॉ-मटेरियल असते. म्हणून निरिक्षण क्षमता वाढविणे खूप गरजेचे आहे. यासाठी ग्राफिक्स / अनिमेशनला प्रवेश घेताना अभ्यासक्रमात विद्यार्थ्याची निरिक्षण क्षमता वाढवण्यासाठी काय शिकवले जाते याची विचारणा जरुर केली पाहिजे. हाही एक निरिक्षणाचा भाग आहे. निरिक्षण चुकले की परिणाम चुकला हे लक्षात ठेवा
विचार करणे :- विचार करणे ही सुध्दा एक जन्मजात नैसर्गिक सवय आहे. आणि ही विचार प्रक्रिया मनात सतत सुरु असते. थोडक्यात विचार करायला शिकवायला लागत नसले तरी विचार कसा करावा हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो.एखाद्याची अधोगती किंवा प्रगती होते. किंवा हातून एखादे चांगले / वाईट काम घडते. याला विचारच कारणीभूत असतात. म्हणून एनिमेशनच्या द्रुष्टीने पहायला शिकविल्यानंतर योग्य दिशेने विचार करायला शिकवणे क्रमप्राप्त आहे. निरिक्षण करणे, विचार करणे, तर्क करुन निष्कर्ष काढणे या जरी मानसशास्त्रीय संकल्पना असल्या तरी त्या ग्राफिक्स / अनिमेशनसाठी खुप महत्वाच्या भूमिका बजावत असतात. त्या द्रुष्टीने ग्राफिक्स / अनिमेशन शिकवणार्या संस्थांमध्ये किती प्रयत्न केला जातो हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून ग्राफिक्स / अनिमेशचा अभ्यासक्रम पाहताना अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही हे विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे.
कल्पकता :- योग्य प्रकारे निरिक्षण आणि जाणिवपुर्वक विचार करुन एखादी भन्नाट कल्पना सुचणं ही त्यानंतरची पायरी की जी एखाद्या सुदंर कलाकृतीस जन्म देते. एखादी उत्त्म जाहिरात, उत्कृष्ट चित्रपट, आश्चर्यजनक २डी/३डी फिल्म, विषयसंगत फोटोग्राफी, अर्थपूर्ण गीत, मधुर संगीत यांच्या मुळाशी एक कल्पना असते, एक भावना असते. म्हणूनच काहीतरी नवीन निर्माण होतं. ज्याला लोक चांगलं म्हणतात. कल्पना कशी सुचते हा खूप गमतीशीर विषय आणि गंभीर विषय आहे. आणि याचा अभ्यास ग्राफिक्स / अनिमेशनमध्ये असलाच पाहिजे या मताचा मी आहे. त्याशिवाय अनिमेशनची गाडी पुढे जातच नाही. हे उघड गुपित आहे. एनिमेशनचा कोर्स करुन नोकरी मिळते याचा अर्थ तो कॉम्प्युटर म्हणून कोणाच्यातरी हाताखाली सांगेल तसे काम करण्यासाठी जातो. नंतर हळू त्याला पदोन्नती मिळते. अनिमेशनचा कोर्स करुन कॊणी एकदम आर्ट डायरेक्टरच्या जागेवर जात नाही. त्यासाठी खुप परिश्रम करावे लागतात. त्यासाठी योग्य दिशा दाखविणारा अभ्यासक्रम आहे की नाही हे तपासूनच प्रवेश घ्यावा. यानंतर ग्राफिक्स / अनिमेशनमधील इतर महत्वाच्या टप्प्यांच विचार आपण पुढील लेखात करु.
ग्राफिक्स / एनिमेशन : एक मनोरंजक करिअर - ३
रेखाटने :- निरिक्षण, विचार करणे आणि कल्पकता या गोष्टी ग्राफिक्स अनिमेशनमध्ये किती महत्वाच्या भूमिका बजावतात हे आपण गेल्या लेखात पाहिले. निरिक्षण आणि विचार करून विषयानुरुप सुचलेली कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी गरज असते माध्यमांची. एखादी कल्पना विविध माध्यमातून साकार करताना त्या त्या माध्यमांचे वैशिष्टे लक्षात घ्यावे लागते. यामध्ये प्रिंटमिडिया, फोटोग्राफी, २डी/ ३डी अनिमेशन, इंटरनेट आदी माध्यमांचा समावेश होतो. पण कॊणत्याही माध्यमातून एखादी कल्पना साकार करण्याअगोदर संभाव्य कलाकृतीचा आराखडा तयार करावा लागतॊ. आणि तो पेन्सिल स्केचिसच्या माध्यमातून दाखवतात. एखादा अनिमेटेड प्रोजेक्ट करण्याअगोदर त्या मधील प्रत्येक द्रुष्याचे वर्णन अगदी सुक्ष्मपणे पेपरवर मांडावे लागते. यामध्ये द्रुष्ये, कॅरॅक्टर्स, डायलॉग, म्युझिक आदींचा समावेश होतो. चित्रीकरणाच्या क्षेत्रात त्याला ’स्टोरी बोर्ड’ म्हणतात. अनिमेशनमधील एखादी काल्पनिक व्यक्तिरेखा, प्राणी किंवा वास्तू कशी असावी हे जर स्केचिसच्या सहाय्याने दाखवले तरच प्रत्यक्ष सॉफ्टवेअरमध्ये काम करताना मॉडेल बनवणे सोपे जाते. म्हणून सफाईदार रेषांनी प्रमाणात एखादे मॉडेल पेपरवर चित्रीत करता आले पाहिजे. त्यासाठी स्केचिसचा अभ्यास अगदी गरजेचा आहे. आणि तो शास्त्रशुध्द पध्दतीने शिकणे एनिमेटर होण्याच्या द्रुष्टीने महत्वाचे आहे.
लेखन कौशल्य :- ग्राफिक्स / एनिमेशनमध्ये एखाद्या कल्पनेचे सादरीकरण करताना शब्दांना खूप महत्व असते. विषयाला अनुसरूण शब्दरचना करुन थोडक्यात शब्दात बरंच काही सांगता आलं पाहिजे. ही कला आत्मसात करण्यासाठी सतत काही ना काही लिखाण, चिंतन, मनन करण्याची आवश्यकता असते. एखादा मुद्दा समजावून आणि पटवून सांगण्यासाठी सूचक शब्दांची शृंखला तयार करावी लागते. त्याला जाहिरात क्षेत्रात ’कॉपी रायटिंग’ असे म्हणतात. जाहिरात विश्वात कॉपी रायटिंगसाठी स्वतंत्र पोस्ट असते. हा कॉपीरायटर संबंधित विषयावर फक्त लिखानाचेच काम करतो. ग्राफिक्स / एनिमेशन क्षेत्रात अनिमेटर म्हणून वावरताना कॉपीरायटिंग कशाशी खातात एवढे तरी माहित असावे लागते. द्रुकश्राव्य एखाद्या एनिमेटेड कलाकृतीमध्ये शब्दसुरांच्या रचनेला खुपच महत्व आहे. म्हणून ग्राफिक्स / एनिमेशन कोर्स मध्ये शब्दरचनेला डावलून चालणार नाही. तेव्हा अनिमेशन क्षेत्रात करिअर करु इच्छिणार्या विद्यार्थांनी संबंधित संस्थेत प्रवेश घेताना कॉपीरायटिंग संबंधित अभ्यासक्रमाची माहिती घेतली जाते.
अनिमेशन इंडस्ट्रीमध्ये क्रिएटिव्हीटीला खूप महत्व असते आणि त्यासाठी निरिक्षण, विचार करणे, कल्पकता, रेखाटने आणि कॉपी रायटिंगला विशेष प्राधान्य असते. कॉम्प्युटरचे द्यान ही त्यानंतरची पायरी आहे. थोडक्यात ग्राफिक्स / एनिमेशनमध्ये जे काही करायचे आहे ते कागदावर फायनल झाल्यानंतर कॉम्प्युटरवर डिझाईनिंगला सुरुवात होते. एनिमेशनच्या शिखराकडे घेऊन जाणारी एक एक पायरी शिकत असताना ती प्रत्येक पायरी मजबूत होणे गरजेचे आहे. एनिमेशनच्या प्रवासातील आतापर्यंत उल्लेख केलेल्या काही पायाभूत गोष्टीनंतर ’ग्राफिक्स डिझाईन’ ही एक अत्यंत महत्वाची पायरी आहे. म्हणून एनिमेशनच्या द्रुष्टीने ग्राफिक डिझाईन समजून घेताना संबंधित अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. कारण एनिमेशनसह, अडव्हर्टायझिंग, फोटोग्राफी, प्रिंटींग, पब्लिशिंग, पॅकेजिंग, इंटरनेट, आदी मिडियामध्ये ग्राफिक डिझाईन हा मुलभूत घटक आहे. थोडक्यात योग्य पध्दतीने ग्राफिक डिझाईनचा अभ्यास केला तर विद्यार्थी सर्वच मिडियामध्ये उत्त्म पध्दतीने काम करु शकतॊ. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याच्या द्रुष्टीने सर्वांगीण अभ्यास असणे गरजेचे असते. आता एनिमेशनसाठी उपयुक्त आणि ग्राफिक डिझाईन अंतर्गत येणार्या काही प्रमुख गोष्टी पुढील लेखात पाहू.
ग्राफिक्स / एनिमेशन : एक मनोरंजक करिअर - ४
ग्राफिक्स / एनिमेशनमधील सर्वच्या सर्व कला शिकून सर्वद्य कोणीच बनूअ शकत नाही. कारण या क्षेत्राची व्याप्तीच खूप मोठी आहे. जसे डॉक्टर म्हटले की ह्दयरोग तद्य, नाक, कान, घसा तद्य, मनोविकार तद्य, त्वचा, फ्रॅक्चर, दाताचा, डोळ्याचा इ.इ.इ. अनेक विषयातील वेगवेगळे तद्य डॉक्टर असतात. अगदी तसेच ग्राफिक्स / एनिमेशनमध्ये लोगो, सिम्बॉलपासून विविध प्रकारच्या प्रिन्टिंगपर्यंत आणि २डी/ ३डी एनिमेशनपासून इंटरनेटपर्यंत वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये मिडियाला अनुसरुन डिझाईन बनविणारे त्या त्या स्तरावरील ग्राफिक डिझाईनर असतात. विविध मिडियामध्ये ग्राफिक डिझाईनर बनविण्यासाठी जरी वेगवेगळी सॉफ्टवेअर्स असली तरी ग्राफिक डिझाईन शिकताना एका विशिष्ट पध्दतीने अभ्यास करावा लागतो. जो केवळ सॉफ्टवेअर शिकण्यापेक्षा खूपच वेगळा असतो. त्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
आकार आणि रचना:-
व्दिमित किंवा त्रिमित आकारांची केलेली संयुत्किक रचना म्हणजे डिझाईन विषय आणि कल्पनेला सुसंगत अपेक्षित परिणाम साधण्यासाठी विशिष्ट पध्दतीने केलेली रचना ही आकर्षक असावी लागते. तरच ती रचना पाहणार्याचे लक्ष्य वेधून घेते. आकार आणि रचनेशिवाय कोणतेही २डी किंवा ३डी डिझाईन आस्तित्वातच येऊ शकत नाही. ’मला सॉफ्टवेअर कळले. टुल्स व मेनूबार समजला, मला थ्रीडी मॉडेल बनवता आले. सेकंदाला २५ फ्रेमरेटच्या नियमाने मला ते अनिमेट करता अले.’ म्हणून मी ग्राफिक डिझाईनर किंवा एनिमेटर झालॊ असे कधीच होत नाही. केवळ सॉफ्टवेअर शिकून नव्हे तर विविध कल्पनांचे भांडार असणाराच चांगला ग्राफिक डिझाईनर किंवा अनिमेटर होऊ शकतो. ही गोष्ट सहसा ग्राफिक / अनिमेशनला प्रवेश घेताना कोणी लक्षात घेत नाही. आकार आणि रचना या विषयाना कोर्समध्ये किती महत्व आहे आणि हे विषय विद्यार्थ्यांना कसे समजतात यावर त्या विद्यार्थांचे या क्षेत्रातील यश अवलंबून आहे.
रंग:- रंग हा कोणत्याही मिडियामध्ये ग्राफिक डिझाईनर अत्यंत महत्वाचा घटक आहे. आणि प्रथमदर्शी ग्राफिक डिझाईनर पाहताना रंगाचा पाहणार्याच्या मनावर परिणाम होत असतॊ. रंगसंगती योग्य नसेल तर एखादी चांगली रचनासुध्दा मार खाऊ शकते.ग्राफिक / एनिमेशनमध्ये व्दिमित किंवा त्रिमित आकारांची रचना करताना रंग आणि रंगसंगती खूप विचार करावा लागतॊ. म्हणून ग्राफिक / एनिमेशन शिकताना रंग, रंगचक्र, रंगाची वैशिष्टे, विविध रंगसंगती, मुळ रंगाच्या मिक्सिंगपासून तयार होणारे रंग, विषयाला अनुसरून रंग वापरण्याच्या पध्दती, आदी अनेक महत्वाच्या गोष्टींचा स्वतंत्र अभ्यास करावा लागतॊ. तरच एखाद्या सुंदर रचनेची रंगसंगती कशी असावी हे कळते. बहुतांश ठिकाणी ज्या त्या सॉफ्टवेअरमधील तयार कलर पॅलेटमधीलच रंग वापरतात. पण हवा तसा रंग आणि आकर्षक रंगसंगती तयार करण्याच्या पध्दती अपवादानेच अभ्यासक्रमात असल्यामुळे ग्राफिक / एनिमेशन मध्ये विद्यार्थाला केवळ सॉफ्टवेअर शिकण्यावरच समाधान मानावे लागते हे दुर्दैव.
फॊटॊग्राफी :- फॊटॊग्राफी हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. तरीही ग्राफिक / एनिमेशन मध्ये याचे स्थान खूप मोठे आहे हजार शब्दांपेक्षा एक फोटो खूप काही सांगू शकतो.ग्राफिक / एनिमेशन मध्ये फोटॊग्राफीचा आधार घेऊनच मॉडेल बनवितात. म्हणून फोटॊग्राफीचा तंत्रशुध्द अभ्यास सदर कोर्समध्ये असला पाहिजे. प्रिन्टिंग, एनिमेशन, आणि इंटरनेट मिडियामध्ये फोटोग्राफीची गरज ऒळखून त्या संबंधित फोटॊग्राफिचे प्रकार आणि टेक्निक्स यांचा अभ्यास जरुर केला पाहिजे. प्रत्यक्ष फोटोग्राफी करताना होणारा काम्पॊझिशन आणि लायटिंगचा अभ्यास थ्रीडी एनिमेशनमध्ये उपयोगी पडतो. शिवाय एखाद्या डिझाईनसाठी आवश्यक असलेल्या फोटोसाठी विद्यार्थाला दुसर्यावर अवलंबून रहावे लागत नाही.
कॅलिग्राफी :-. ग्राफिक / एनिमेशन च्या काही सादरीकरणामध्ये अक्षरे आणि शब्दांचा वापर असतोच असतो. तयार फॉन्ट (अक्षरांचे नमुने) वापरून डिझाईनमध्ये टायपिंग केले जाते. रेडिमॆड फॉन्टसचे वेगवेगळे तयार नमुने भरपूर असतात. पण तरीही विषयाला अनुसरूण असा फॉन्ट नसेल तर कॅलिग्राफी महत्वाची ठरते. विविध पेनच्या सहाय्याने केलेली कलात्मक कॅलिग्राफी ही संबंधित कलाकृतींमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कॅलिग्राफीचे प्रकार, नियम, आणि पध्दतीचा अभ्यास ग्राफिक / अनिमेशनसाठी वापरण्यात येणारी सॉफ्टवेअर्स, त्यांचे मह्त्व आणि या क्षेत्रातील नोकरी व्यवसायाच्या संधी या गोष्टी पाहू
ग्राफिक्स / एनिमेशन : एक मनोरंजक करिअर - ५
ग्राफिक / एनिमेशनची पार्श्वभूमी, करियर म्हणून या क्षेत्राकडे पाहताना वैचारिक निरिक्षणातून सुचणारी कल्पकता, आवश्यक रेखाटणे, लेखन कौशल्य तसेच ग्राफिक डिझाईन संदर्भातील आकार, रचना, रंगसंगती, फोटॊग्राफी आणि कॅलिग्राफीचे महत्व आदी गोष्टी आपण आजवरच्या लेखांत पाहिल्या. आता क्रम लागतॊ तो विविध सॉफ्टवेअर्सचा. सॉफ्टवेअर्स वपरण्यास शिकविणे खरे तर ग्राफिक्स / अनिमेशनच्या अभ्यासक्रमातील एक छोटासा भाग आहे. थोडक्यात सॉफ्टवेअर्सकडे एक टूल म्हणून पाहणेच ठीक आहे. सुचलेल्या कल्पना जलद साकार करण्यासाठी उपयोगात येणारी ती टेक्नॉलॉजी आहे. जसे एखादे पेटिंग करताना रंग, ब्रश, कागद, पॅलेट, कॅन्व्हास आदी मटेरियल लागते त्या ऎवजी कॉम्प्युटरवर सॉफ्टवेअर्सचा वापर आहे एवढेच. एखादे सॉफ्टवेअर स्वत: काहीच क्रिएटिव्ह काम करु शकत नाही. त्याला ऑपरेट करण्यासाठी मानवी मेंदूची गरज असते. म्हणूनच ज्याच्या जवळ विचार करण्याची क्षमता आहे. तोच खरा ग्राफिक डिझाईनर किंवा अनिमेटर असतो. विविध सॉफ्टवेअर्सचा वापर करता आला पाहिजे ही गोष्ट खरी आहे. म्हणून ग्राफिक / अनिमेशनला प्रवेश घेऊन निव्वळ सॉफ्टवेअर्सच शिकणार असाल तर तुमच्यमध्ये क्रिएटिव्हिटी कशी येणार? तुम्हाला किती सॉफ्टवेअर्स माहित आहेत. या पेक्षा तुमच्याकडे कल्पकता किती आहे हे महत्वाचे डिजिटल फोटॊग्राफी, प्रिंटिंग, प्रेझेंटॆशन, टूडी ग्राफिक्स, टूडी एनिमेशन, थ्रीडी ग्राफिक्स, थ्रीडी एनिमेशन, वेब ग्राफिक्स, वेब एनिमेशन, रेडरिंग, साऊंड एडिटींग, साऊंड रेकॉर्डिंग, फोटॊ एडिटींग, फोटॊ मिक्सिंग, मूव्ही मिक्सिंग, प्रोडक्ट मॉडेलिंग, कॅरॅक्टर मॉडेलिंग, पर्स्पेक्टिव्ह, इंटेरिअर डिझाईन, वॉक थ्रू, इ.इ.इ. खूप काही ग्राफिक / एनिमेशनमध्ये येतं आणि त्यासाठी कोरल ड्रा, इलेस्ट्रेटर, फोटोशॉप, इमेज रेडी, इन डिझाईन, क्वॉर्क एक्स्प्रेस, फ्लॅश, थ्रीडी मॅक्स, माया, कम्बशन, आफ्टर इफेक्टस, इलॅस्टिक रिअलिटी, जिफ एनिमेटर, स्वीश, फ्रंट पेज, ड्रीम व्ह्युवर, साउंट फोर्ज, ऑडिशन, फायनल कट प्रो, आदी अनेक सॉफ्टवेअर्सचा त्यासाठी वापर करतात. परंतू सलग एकापाठॊपाठ एक सॉफ्टवेअर्स शिकवून विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ होतो. आणि मुख्य विषयांकडे दुर्लक्ष होण्याची भिती असते. ग्राफिक्स / अनिमेशनमधील मुख्य विषय समजून सांगितल्यावर कॊणत्या विषयासाठी कोणते सॉफ्टवेअर का वापरायचे.विविध सॉफ्टवेअर्स मध्ये काय फरक असतो. आणि मुख्य विषयाच्या सादरीकरणासाठी कोणते सॉफ्टवेअर्स नेमके केव्हा आणि किती प्रमाणात वापरायचे असते हे विद्यार्थ्याला समजणे गरजेचे असते. नाहीतर सॉफ्टवेअर्सच्या गोंधळात मुख्य विषयाकडे विद्यार्थाचे दुर्लक्ष होते. तसे पाहिले तर संपूर्ण अनिमेशनमधील सर्व विषयांचा तुलनात्मक विचार केला तर केवळ २० टक्के भाग हा सॉफ्टवेअर्सचा आहे. बाकी ८० टक्के भागात विविध विषय येतात. त्यामध्ये निरिक्षण, परिक्षण, विचार करणे, तर्क करणे, कल्पकता, स्केचिस, रंग आणि रंगसंगती, ले-आऊट, डिझाईन, आर्टवर्क, अडव्हर्टायझिंग, फिल्म मेकिंग, मार्केटिंग, प्रेझेंटॆशन टेक्निक्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्कील आदी बरेच मुख्य विषय असतात.
संधी- ग्राफिक्स / अनिमेशनचा अभ्यास आपण स्टेप बाय स्टेप सुनियोजित करित गेलात तर या क्षेत्रातील प्रत्येक टप्प्यात तुम्ही खूप काही करू शकता. भले काम लोगो सिम्बॉलचे असुदे, स्क्रिन-ऑफसेट प्रिंटिंगचे असुदे, फोटॊ-मिक्सिंगचे, फोटो अल्बमचे असुदे, पॅकेजिंग प्रिंटींगचे किंवा पब्लिकेशनचे असुदे, वेबसाईट किंवा प्रेझेंटेशन सीडीचे असुदे, वॉक थ्रुचे असुदे, मॉडेलिंग, रिगिंग, टेक्चरिंग किंवा अनिमेशन्चे असुदे, ही सारी कामे करण्यासाठी एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे कल्पकता. तर ही कल्पकता आणि कलात्मक द्रुष्टी येण्यासाठी सॉफ्टवेअर शिवाय इतर अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. बर्याच गोष्टींचा सखोल अभ्यास करावा लागतो हे स्पष्टच आहे. विचारपुर्वक प्रवेश घेऊन योग्य क्रमाने शिकत गेलात तर कोर्स पूर्ण करुन तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकता अथवा भरपूर पगाराच्या नोकर्या मिळतातच. त्यासाठी ग्राफिक्स एनिमेशनला प्रवेश घेताना नोकरीच्या हमीपेक्षा उत्कॄष्ट शैक्षणिक दर्जाची हमी घ्या. या क्षेत्रातील संधींचाच विचार करायचा झाल्यास तुमची वैचारिकता, आवड, पात्रता, कल्पकता यानुसार शेकडॊ संधी आज उपलब्ध आहेत. त्या सर्वच्या सर्व संधीचा तपशीलवार उल्लेख करणे